farmer pro 
देश

Farmer Protest: आंदोलनाची धार वाढली; शेतकऱ्यांनी उपसलं उपोषणाचं अस्त्र

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 'आर या पार'ची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. 14 डिसेंबर रोजी सर्व शेतकरी प्रतिनिधी सिंघू बॉर्डवर उपोषणाला बसणार आहेत. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदे संपूर्णपणे मागे घेण्याची मागणी कायम ठेवली आहे. जर केंद्र सरकारला आमच्यासोबत चर्चा करायची असेल, तर आमची त्यासाठी तयारी आहे. पण, आधी आपण हे कायदे मागे घेण्याबाबत चर्चा करु ,असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. 

14 डिसेंबर रोजी सर्व शेतकरी नेते एकाच व्यासपीठावर उपोषणाला बसतील. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावे. आम्हाला सुधारणा नको आहे, आमची मागणी कायदे रद्द करण्याची आहे. आमची मागणी मान्य झाली नाही, तर आम्ही सर्व नेते उपोषणाला बसू, असं संयुक्त किसान आंदोलनाचे नेते कमल प्रित सिंग पन्नू म्हणाले आहेत. आमचे आंदोलन दडपण्याचा सरकारचा विचार आहे, पण आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही शांततेने हे आंदोलन करतच राहू, असंही ते म्हणाले आहेत. 

शेतकरी रविवारी ट्रॅक्टर मार्च काढणार आहेत. हा मार्च सकाळी 11 वाजता शाहजहानपूर येथून सुरु होईल आणि त्यानंतर जयपूर-दिल्ली मुख्य रस्ता अडवण्यात येईल. पंजाबमधून येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रोली रोखल्या जात आहेत. माझं केंद्र सरकारला आवाहन आहे की त्यांनी शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत येऊ द्यावं, असं कमल प्रित सिंग पन्नू  म्हणाले आहेत. सरकारने आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असलेले हे आंदोलन सुरुच राहिल, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT